Gemstones
19 / Feb

माणिक

माणिक हे सूर्याचे रविरत्न आहे.माणिक दुःख,चिंता मिटवतो.विलास-वैभवातून येणारे कुप्रभावही नष्ट

करतो.पूत्रप्राप्ती,आरोग्य ,स्त्रीआरोग्य यासाठी माणिक प्रभावी काम करतो.माणिक आपल्याला मानसन्मान,

किर्ती मिळवून देतो.दीर्घायुष्य प्राप्त होते.नेत्रविकार, रक्तविषयक आजार यामध्ये प्रभावशाली काम करतो. 

दीर्घकाळ आजारी असणा- या व्यक्तीच्या उशाशी पद्मराग ( प्रभावी माणिक) हे रत्न ठेवले असता शरीरातील रोगजंतू नष्ट करते.

माणिक रत्नाचे प्रकार:-

१. पद्मराग:- हे सर्वोच्च व श्रेष्ठ दर्जाचे माणिक सोन्याच्या तप्त रसाप्रमाणे तेजस्वी दिसते.सूर्यप्रकाशात त्यातून असंख्य किरणे परावर्तित होतात. हे रत्न कोमल व गुळगुळीत असते.

२. जामुनिया:- यातून जांभळा व लाल रंग दिसतो. हे कन्हेरीच्या फुलासारखे दिसते.

३:- सौगन्धिक माणिक:-डाळींबाच्या दाण्यासारखे हे माणिक चकोर पक्षांच्या डोळ्याच्या रंगाचा आभास निर्माण करते.

४. कुरविंद माणिक:- पद्मराग माणकासारखाच याचा रंग असतो.मात्र हे लहान आकारातच सापडते.

५. नीलगंधी माणिक:- कमलपुष्पाच्या रंगाचे हे रत्न निळसर झाकही दर्शविते.

( वरील रत्नांचे प्रकार हे अल्लाउद्दीन खिलजींचा कोषागार प्रमुख हक्कूर फैज याने नवरत्नांवर लिहिलेल्या ‘रत्नपरिक्षा’ ग्रंथात माणकाचे प्रकार सांगितले आहेत.)

ख- या- खोट्याची परिक्षा:-

१. नकली माणिक हे ख- या माणकापेक्षा जादा चमकदार दिसतात.

२. खरे माणिक डोळ्याच्या पापणीवर ठेवल्यास त्याचा स्पर्श थंड भासतो.

३. चांदीच्या भांड्यात काही मोती घेऊन त्यात माणिक ठेवून ते भांडे सूर्यप्रकाशात आणले तर सर्व मोत्यांवर लालसर झाक दिसली तर ते अस्सल समजावे.

४. गायीच्या दुधात माणिक टाकल्यास दुधावर गुलाबी रंगाची झाक दिसली तर ते अस्सल समजावे.

५. कृत्रिम माणिक रत्नातील चीर चमकदार दिसते तशी ख- या रत्नातील दिसणार नाही. ही चीर वेडीवाकडी असू शकते.मात्र कृत्रिम रत्नात ती सरळ रेषेत दिसेल.

६. खरे माणिक द्विवर्णी असते तर कृत्रिम माणिक कोणत्याही कोनातून एकाच रंगाचे दिसेल.

७. अंधारात कृत्रिम माणिक अधिक चमकेल,तर अस्सल माणिक उजेडात अधिक चमकतो.

८. बर्फाच्या एका तुकड्यावर खरे माणिक रत्न ठेवल्यास बर्फातून एक प्रकारचा मंद ध्वनी निघतो.कृत्रिम माणकाच्याबाबत असे घडत नाही.

माणिक रत्न रविवारी ,सूर्योदय झाल्यापासून एक तासापर्यंतच्या वेळात पंचधातूत अथवा सोन्यात जडवून उजव्या हाताच्या अनामिकेत धारण करावे.

‘ आ कृष्णेन रजसा वर्तमाने निवेशषन्नमृतं मर्त्यच्या’’ हिरण्येन सविता रथेना देवो याती भुवनाम्नि पश्यन्’ हा मंत्र म्हणून ते धारण केल्यास शुभ मानले जाते.

Categories