Gemstones
20 / May

सिंह रास

अग्नितत्वाची ही रास असून सूर्याच्या अधिपत्याखालील आहे.पूर्व आणि दक्षिण या दोन्ही दिशा आपल्याला लाभदायक आहेत. १,१०,१९,२८ या तारखांना महत्वाची कामे करावीत.

२४ जुलै ते २३ ऑगस्ट हा आपला भाग्यकाळ आहे.या काळात महत्वाची कामे करावीत.

या व्यक्ती स्वतंत्र विचारसरणीच्या असतात.महत्वाकांक्षी,स्वाभिमानी,हट्टी हा या व्यक्तींचा स्वभावगुण आहे.या राशीचे लोक शीघ्रकोपी असतात.यांना अन्याय सहन होत नाही.या राशीचे लोक मोठया मनाचे व उदार प्रवृत्तीचे असतात.यांच्यात अविरहत ऊर्जा असते.कोणत्याही क्षेत्रात या नावलौकिक मिळवू शकतात.जे काम हातात घेतले ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत.

यांना ह्रदयविकार,डोकेदुखी,नाक,कानाचे आजार मूत्राशयाचे त्रास हे आजार होतात.

शुभ वार रविवार,गुरूवार,मंगळवार
अशुभ वार शनिवार
अशुभ रंग काळा
शुभ रंग सोनेरी,पिवळा,भगवा
मित्र रास मिथुन,कन्या,मेष,धनु
शत्रू रास वृषभ,तुळ,मकर,कुंभ
रत्नांचा वापर माणिक

 

यांनी माणिक हे रत्न धारण करावे.

Categories