Gemstones
20 / May

वृश्चिक रास

ही रास जलतत्वाची असून मंगळाच्या अधिपत्याखाली आहे. ९,१८,२७ या तारखांना महत्वाची कामे करावीत.पूर्व व पश्चिम या दोन्ही दिशा आपल्याला लाभदायक आहेत.

२४ ऑक्टोंबर ते २३ नोव्हेंबर हा आपला भाग्यकाळ आहे. महत्वाची कामे या कालावधीत करावी.

आपल्यातील आत्मविश्वास व दृढनिश्चय हे गुण यश मिळवून देणारे आहेत.हे लोक अत्यंत तत्वनिष्ठ आणि आदर्शवादी असतात.यांची बुध्दी तीक्ष्ण पण चंचल असते.मैत्रीसाठी जीव पणाला लावणारे हे लोक शत्रुत्वही जीवापाड निभावतात.स्वभाव धाडसी असतो.या व्यक्ती अतिशय चांगल्या असू शकतात किंवा अतिशय वाईटही असू शकतात.साधारणपणे यांचा भाग्योदय जीवनाच्या उत्तरार्धात होतो.हे लोक पत्रकार,मुत्सदी राजकारणी,साहित्यिक,संगीतज्ञ,कलाकार होऊ शकतात.पोलिस दल,सरकारी गुप्त विभागातही चांगले काम करतात.एकाचवेळी दोन प्रकारचे व्यवसाय सहजपणे करू शकतात.स्वभावाने रागीट,एककल्ली,चिडखोर असतात.संकटाच्यावेळी धैर्याने व शांततेने युक्तीचा वापर करून परिस्थिती हाताळतात.समोरच्याचं मन वाचणं यांना छान जमतं;पण त्यांचं मन जाणणं मात्र अवघड असतं.मेहनती असतात.

शुभ वार मंगळवार,गुरूवार,शुक्रवार
अशुभ वार सोमवार,शनिवार
अशुभ रंग हिरवा, काळा
शुभ रंग पिवळा,गुलाबी,शेंदरी
मित्र रास कर्क,मीन
शत्रू रास मेष,मिथुन,सिंह,धनु
रत्नांचा वापर पोवळे,कार्नेलियन

 

यांनी पाण्याचे दान करावे.विहीरी बांधून दयाव्या.पाणपोई बांधून दयाव्या.घरी आलेल्यांना प्रथम पाणी पाजावे.

शय्या,पादत्राणे दान करावी.

यांनी पोवळे,कार्नेलियन वापरावे.

Categories