Gemstones
20 / May

तूळ रास

ही रास शुक्राच्या अधिपत्याखाली आहे.वायूतत्वाची ही रास आहे. ६,१५,२४ या तारखांना महत्वाची कामे करावी.

उत्तर दिशा ही आपली भाग्यवर्धक दिशा आहे.

२४ सप्टेंबर ते २३ ऑक्टोंबर हा आपला भाग्यकाळ आहे. महत्वाची कामे या कालावधीत करावी.

उत्तम,आकर्षक व्यक्तीमत्व,चंचलता,स्व‍च्छंद वृत्ती यांना लाभलेली असते.दुस-यांना आकर्षित करण्याची शक्ती यांच्यात असते.हे लोक प्रेमळ,हट्टी,महत्वाकांक्षी असतात.यांच्यात भावनेला आवर घालण्याची क्षमता असल्यामुळे ब-याच वेळेला आतल्या आत भावनांवर संयम ठेवतात.यांचा स्वतःवर विश्वास असतो.स्वतःचा मार्ग स्वतः शोधून यशस्वी होतात.या व्यक्ति जबाबदार,कुटुंबवत्सल असतात.भावंडांची शिक्षणं,त्यांची कुटुंबं,मित्रमंडळी यांचाही संभाळ या व्यक्ती करू शकतात.

नोकरीपेक्षा स्वतःची कन्सलटन्सी किंवा व्यवसाय उत्तम करू शकतात.उत्तम संवादकौशल्य यांच्याकडे असते.व्यवस्थापनक्षेत्रातही यशस्वी होतात.कलाक्षेत्रातही यांना आवड असते.

तुळेमध्ये शारीरिक व बौध्दिक क्षमता एकत्र वापरण्याची ताकद असल्यामुळे यांना व्यावहारिक प्रगतीमध्ये याचा फायदा होतो.मनोरंजनाला प्राधान्य देणारे असल्यामुळे जीवनाचा आनंद घेऊ शकतात.सतत प्रेमाची व स्वतःला समजून घेण्याची अपेक्षा करणारे असतात.

शुभ वार बुधवार,गुरूवार,शुक्रवार.
अशुभ वार शनिवार
अशुभ रंग काळा,लाल
शुभ रंग पिवळा,हिरवा,निळा
मित्र रास मिथुन,कुंभ,मकर,धनु,कर्क
शत्रू रास सिंह
रत्नांचा वापर हिरा,स्फटीक

 

या लोकांनी ज्ञानाचे दान करावे.शिक्षण दयावे.पुस्तके वाटावी.झाडांची व पक्ष्यांची सेवा करावी.

नवे वस्त्र ,उडीद डाळ,तेल,दूध यांचे दान करावे.

यांनी  ही रत्ने वापरावीत.

Categories