Gemstones
20 / May

कुंभ रास

या राशीचा स्वामी शनि आहे.वायूतत्वाची ही रास आहे.उत्तर व दक्षिण या दोन्ही दिशा आपल्याला लाभदायक आहेत.

२१ जानेवारी ते १९ फेब्रुवारी हा आपला भाग्यकाळ आहे. महत्वाची कामे या कालावधीत करावी.

हे लोक प्रामाणिक असतात.खांदयावर घागर घेऊन पाण्याच्या शोधात निघालेला व विचारात पडलेला पुरूष या राशीचे प्रतिक आहे.कुंभ व्यक्ती ज्ञानरूपी पाण्याचा शोध घेत असते.रागावले तरी फार काळ राग मनात ठेवत नाही.यांच्या आसपास हितशत्रू असतात.यांचा भाग्योदयाचा आलेख चढउताराचा असतो.या व्यक्तींच्या सरळ स्वभावाचा काही लोक गैरफायदा घेतात.त्यामुळे व्यापारात,उदयोग-व्यवसायात हानी पोचू शकते.त्यांचा स्वतःवरचा विश्वास उडतो.ते नकारार्थी विचार करू लागतात.ज्या व्यक्तींवर मनापासून प्रेम करतात त्यांच्याशी कायम एकनिष्ठ असतात.जवळच्या मित्रांना शेवटपर्यंत साथ देतात व वेळ पडली तर संघर्षही करतात.भावना सतत मनात दडपून ठेवल्याने मनावर ताण येतो.एखाद्यावेळी मनातल्या भावना अचानक व्यक्त करून विस्फोट करतात व नंतर पश्चाताप करतात.शनिप्रभावामुळे या व्यक्ती धार्मिक ,व्यवसायचतूर असतात.या लोकांना आसपासच्या लोकांचे कष्ट दूर व्हावे,समाजाचे भलं व्हावं असं वाटत असतं.जनहिताच्या क्षेत्रात हे लोक जास्त चांगलं काम करू शकतात.संधीची वाट न बघता स्वतः संधी निर्माण करतात.संवेदनशील मनावर नियंत्रण ठेवलं व आत्मविश्वास वाढवला तर कोणत्याही क्षेत्रात यांना यश मिळू शकते.

विमा कंपनी,बॅंक,विविध संस्था,रेल्वे सेवा,विमान कंपनी,संशोधन क्षेत्र,वीज वितरण सेवा या क्षेत्रात हे लोक चांगले काम करतात.

शुभ वार. बुघवार,शनिवार
अशुभ वार मंगळवार,गुरूवार
अशुभ रंग हिरवा
शुभ रंग पांढरा,राखाडी
मित्र रास मीन,मकर,मिथुन,वृषभ,तुळ
शत्रू रास कर्क,सिंह,वृश्चिक
रत्नांचा वापर निलम,अमेथिस्ट

 

या लोकांनी ज्ञानाचे दान करावे.शिक्षण दयावे.पुस्तके वाटावी.परमार्थाचे व व्यवहाराचे मार्गदर्शन करावे.झाडांची व पक्ष्यांची सेवा करावी.सर्वांना भरपूर प्रेम दयावे.वादविवादात न पडता जास्तीत जास्त मौन पाळावे.

तीळ व लोखंड यांचे दान करावे.

यांनी निलम,अमेथिस्ट ही रत्ने वापरावीत.

Categories