Gemstones
20 / May

कर्क रास

ही रास चंद्राच्या अधिपत्याखालील आहे.जलतत्वाची ही रास आहे.पश्चिम व उत्तर दोन्ही दिशा आपल्याला लाभदायक आहेत. २,११,२०,२९ या तारखांना महत्वाची कामे करावीत.

२२ जून ते २३ जुलै हा भाग्यकाळ आहे. या काळात महत्वाची कामे करावीत.

अस्थिर मनोवृत्तीमुळे विचार आणि निर्णय चंचल असतात.या व्यक्ती अत्यंत भावनाशील व संवेदनशील असतात.या व्यक्तींना संगीत,साहित्य,प्रवास,कलाक्षेत्रात आवड असते.बारिकसारिक गोष्टींवरून यांचे मनःस्वास्थ बिघडू शकते.थोड्याशा अपयशाने यांचा आत्मविश्वास डळमळतो.ज्या क्षेत्रात या व्यक्ती असतात तिथे त्यांना उच्च स्थान,यश व भरपूर प्रसिध्दी मिळू शकते.कामासाठी लागणारी चिकाटी,दृढनिश्चय व आत्मविश्वास यांच्यामध्ये कमी असतो.

शुभ वार. सोमवार,मंगळवार,गुरूवार
अशुभ वार बुधवार
अशुभ रंग काळा ,लाल
शुभ रंग पांढरा,चंदेरी
रत्नांचा वापर मोती,मूनस्टोन

 

पाण्याचे दान करावे.विहिरी बांधून दयाव्या.पाणपोई बांधून दयावी.घरी आलेल्यांना प्रथम पाणी पाजावे.

दूध,खीर,लाल वस्त्र दान करावे.

मोती,मूनस्टोन धारण करावा.

Categories