Gemstones
20 / May

कन्या रास

कन्या रास बुध ग्रहाच्या अधिपत्याखाली आहे.पृथ्वीतत्वाची ही रास आहे.पूर्व आणि दक्षिण या दोन्ही दिशा आपल्याला लाभदायक आहेत.महत्वाची कामे ५,१४,२३ या तारखांना करावीत.

२४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर हा कालावधी कन्या राशीचा भाग्यकाळ मानला जातो.या काळात महत्वाची कामे करावीत.

ही द्विस्वभावाची रास आहे.यांना कुशाग्र बुध्दीमत्ता,उत्तम स्मरणशक्ती लाभलेली असते.चांगल्या,वाईटाची जाण असते.यांना विविध कलांमध्ये रूची असते.परदेशगमनाची संधीही मिळू शकते.कलांची आवड असल्यामुळे कलाक्षेत्र,पर्यटन,भाषा किंवा शिक्षणक्षेत्र,चिकित्सक वृत्तीमुळे संशोधन कार्यात तसेच मुत्सदी स्वभावामुळे ,उत्तम संवादकौशल्यामुळे वकिलीक्षेत्रातही चांगलं काम करतात. सर्वच बाबतीत यांना घाई गडबड दिसून येते.काहीसा बेफिकीर स्वभाव असल्याने नोकरी,व्यवसायात किंवा इतर बाबतीतही या व्यक्ती गंभीर नसतात.मानसिक ताण पडला की आरडाओरड सुरू करतात.यांना निराशा पटकन येते .

या व्यक्ती उत्तम टीकाकार आहेत.आपल्या या वृत्तीला आळा घालणेच योग्य.चुका सुधारणे यांचा गुणच आहे पण चुका न करण्याचा प्रयत्न करावा.

शुभ वार बुधवार,शुक्रवार,शनिवार
अशुभ वार सोमवार
अशुभ रंग काळा
शुभ रंग हिरवा,पांढरा.
मित्र रास मेष,मिथुन,सिंह,तुळ
शत्रू रास कर्क
रत्नांचा वापर पाचू,पेरीडॉट,जेड

 

या लोकांनी अन्नदान करावे.गरीबाला धान्य दान दयावे.

खीर,उडीद,तीळ या वस्तूंचे दान करावे.

या लोकांनी पाचू,पेरीडॉट,जेड ही रत्ने धारण करावी.

Categories