
रत्न उपचार
आपले
शरीर ज्या पंचतत्वापासून बनलेले आहे ती पाच तत्वे या सप्तचक्रांमध्ये संतुलित केली जातात. सप्तचक्रांमध्ये असंतुलन निर्माण झाले असता आपल्यातील पंचतत्वांमध्ये असंतुलन निर्माण होते व या असंतुलनातून आपल्याला निरनिराळे आजार होतात.
निरोगी जीवनासाठी ….
निरोगी जीवनासाठी आपली सर्व चक्रे संतुलित असणे गरजेचे असते.यासाठी रत्नशास्त्राप्रमाणे ७ रत्नांचे एकत्र पेंडंट (याला सप्तचक्र पेंडंट) वापरल्यास त्याचाही चांगला फायदा होतो.रोजच्या जीवनात वावरताना आपला अनेक वाईट नजरांशी व वाईट शक्तींशी संबंध येतो.त्यापासूनसुध्दा अनेक आजार होतात.म्हणून काळया टुमेलिनवरील सप्तचक्र वापरणे अधिक चांगले.
रत्ने कशी वापरावीत……..
वेगवेगळया आजारात आधी त्या त्या चक्राच्या रत्नांची सोने ,चांदी वा पंचधातूमध्ये जडवलेली पेंडंट अथवा अंगठी त्या त्या रत्नांच्या बोटात वापरावी.पाण्यावर कोणत्याही गोष्टींचे संस्कार लवकर होतात.त्यामुळे मंदिरात अथवा गुरुच्या ठिकाणी जिथे मंत्रोच्चार किंवा आरती चालू असते तिथे तीर्थ-पाणी ठेवले जाते.कारण त्या लहरींचा संस्कार त्या पाण्यावर होतो व ते पाणी तीर्थ म्हणून घेतले असता त्याचा आपल्याला फायदा होतो.
त्याचप्रमाणे रत्न पाण्यात रात्रभर बुडून ठेवले असता त्यातील वैश्विक (कॉस्मिक) किरणांचा त्या पाण्यावर संस्कार होतो व ते पाणी आपण घेतले असता चक्र संतुलनासाठी त्याचा उपयोग होतो व चक्र संतुलित झाले असता आजार बरा होतो.
उपचारासाठी रत्न वापरताना ती साधारणतः साडेतीन ते चार कॅरेटपर्यंत वापरावी.त्याचप्रमाणे उपरत्न वापरताना ती साधारण सात ते आठ कॅरेटच्या पुढील वापरावीत.
चक्र |
संबंधित उपरत्ने |
|
१. | मूलाधार | लाल गार्नेट,ओनेक्स,ब्लडस्टोन,टायगर्स आय. |
२. | स्वाधिष्ठान | कार्नेलियन,सिट्रीन,व भगवा ओनेक्स. |
३. | मणिपूर | सिट्रीन ,पिवळा अंबर,सनस्टोन. |
४. | अनाहत | पेरीडॉट,हिरवा ओनेक्स. |
५. | विशुध्द | लॅपीझ लाझुली,ब्लू टोपाझ,टरक्वाईझ,ॲक्वामरीन. |
६. | आज्ञा | ॲमेथिस्ट,निळा ओनेक्स,क्रिस्टल. |
७. | सहस्त्रार | मूनस्टोन,क्रिस्टल,ॲमेथिस्ट |
रत्न उपचार…….
मधुमेह,रक्तदाब,संधीवात,थायरॉईड,स्त्रियांच्या आरोग्याच्या अनेक समस्या यामध्ये आयुष्यभर उपचार करावे लागतात व आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात.या सर्व आजारांचा उगम आपल्या स्थूल शरीरात नसून तो आपल्या ऊर्जा शरीरात आहे व ऊर्जा शरीरावर उपचार करण्यासाठी रत्नांसारखे दुसरे प्रभावी औषध नाही.
रत्नशास्त्र व आरोग्य उपचार या संबंधी समजावून घेण्याआधी स्थूल शरीर व ऊर्जा शरीर म्हणजे नेमके काय हे प्रथम समजून घेणे गरजेचे आहे.
आपल्या शरीराप्रमाणे अथवा जन्मतारखेप्रमाणे मदत करू शकेल असे रत्न नक्की कोणते व त्याचे काय उपयोग होतात हे पाहणेही अधिक गरजेचे आहे.उपरत्ने ही रत्नांपेक्षा किमतीने कमी व रत्नांएवढेच प्रभावशाली आहेत.ख-या रत्नांचे सर्व कण,कडा आणि बाजू एकसारख्या असत नाही उलट कृत्रिम रत्न ही प्रामुख्याने एकसारखी दिसून येतात.कृत्रिम रत्नाचा रंग संपूर्ण खड्यात एकसारखाच असतो.
पंचतत्व ठरणा-या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचा केवळ माणसाच्याच नव्हे तर पृथ्वीवरील चराचराच्या जीवनपध्दतीला बदलवत मार्गदर्शक ठरत असतात.त्यामुळेच आपली कर्मे,श्रध्दा,वर्तणूक आणि जीवनाच्या इतर पैलूंवर त्यांचा परिणाम अटळ असतो.या विश्वातील आपल्या शरीरासह सर्व घटक या पंचतत्वांनीच व्यापलेले आहे.या पंचतत्वांचा जीवनाच्या विविध अंगांवर न दिसणारा पण सातत्यपूर्ण असा प्रभाव असतो.
सप्तचक्रांशी संबंधित रंग आणि रत्न यांची माहिती झाल्यावर कोणत्या आजारावर कोणते रत्न उपयोगी ठरते,हे समजून घेता येते.
१. | मूलाधार चक्र | सर्व मांसपेशी व अस्थिपेशी संबंधी आजार. पुरूष…वृषण, टेस्टेस्टेरॉन. स्त्रियांमध्ये…स्त्री अंडाशय,इस्ट्रोजन, व प्रोजेस्टेरॉन या संबंधी. |
२. | .स्वाधिष्ठान चक्र | पचनसंस्था,रक्ताभिसरणसंस्था,मूत्रसंस्था या संबंधी आजार होतात. |
३ | मणिपूर चक्र | यकृत,स्वादुपिंड,अधिवृक्क ग्रंथी या संबंधी आजार होतात. |
४. | अनाहत चक्र | ह्रदय ,फुप्फुसासंबंधी आजार होतात. |
५ | विशुध्द चक्र | थायरॉइड,ग्रंथी,फुप्फुसे व ह्रदय या संबंधी आजार होतात. |
६. | आज्ञा चक्र | शीर्षस्थ ग्रंथी,मानसिक व अध्यात्मिक उन्नती,मेंदूचे कार्य या संबंधी आजार होतात. |
७. | सहस्त्रार चक्र | कर्म चक्राशी संबंधित आजार होतात. |
वरील सर्व आजारांवर मिळणारी रत्ने आमच्याकडे खात्रीशीर व स्वस्तात उपलब्ध आहेत.