Gemstones
20 / May

मीन रास

ही रास जलतत्वाची असून राशी स्वामी गुरू आहे. ३,१२,२१,३० या तारखांना महत्वाची कामे करावीत.उत्तर व पश्चिम या दोन्ही दिशा आपल्याला लाभदायक आहे.

२० फेब्रुवारी ते २० मार्च हा आपला भाग्यकाळ आहे.महत्वाची कामे या काळात करावी.

या व्यक्तींमध्ये नेतृत्वगुण असल्यामुळे समाजात पुढे राहणा-या असतात.यांचे विचार प्रगल्भ असतात.यांच्या विचारातील परिपक्वता इतरांना आश्चर्यचकीत करणारी असते.या व्यक्ती स्वतःचे विचार ऐकवण्यात पटाईत असतात.बहुधा विवाहानंतर यांचा भाग्योदय होतो.निर्णय शेवटपर्यंत रेंगाळत ठेवण्याचा आपला स्वभाव आहे.आपल्यातील संयम,धीर नेहमीच वाईट ठरत नाही.मीन राशीच्या सहवासात एक प्रसन्नता जाणवते.मिळूनमिसळून राहण्याचा आणि समाजप्रिय स्वभाव असल्याने आसपासच्या लोकांमध्ये भरपूर लोकप्रियता लाभते.मनातील गोष्ट मनातच ठेवतात.चंचल स्वभावाने विचार बदलत राहतात आणि मन अस्थिर असतं.हे लोक आपल्या सगळया कामांमध्ये आपल्या कल्पनाशक्तीचा चांगला उपयोग करून घेतात.हे लोक सुखासीन व विलासी स्वभावाचे असतात.स्वतःच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल अशी कोणतीही कृती करत नाही.आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी भरपूर मेहनत करतात.उत्तम संवादकौशल्य ,दुस-याचा आदरसत्कार करणारे,कोणाचेही उपकार न मानणारे,अत्यंत स्वाभिमानी,शिस्तप्रिय,कोणाच्याही अध्यातमध्यात नसणारे असे हे लोक असतात.घर त्यांना नदी किंवा समुद्रकाठी आवडते.पर्यटन,समुद्री पर्यटन,आयात-निर्यात,दूध,प्रवाही वस्तूंचा व्यापार अशा व्यवसायांमध्ये चांगले यश मिळवू शकतात.

शुभ वार मंगळवार,गुरूवार
अशुभ वार सोमवार
अशुभ रंग काळा
शुभ रंग पिवळा,पांढरा,जांभळा
मित्र रास कर्क,वृश्चिक
शत्रू रास मेष,सिंह,धनु
रत्नांचा वापर पुष्कराज,टोपाझ,सिट्रीन,अक्वामरीन

 

यांनी पाण्याचे दान करावे.विहीरी,पाणपोई बांधून दयाव्या.घरी आलेल्यांना प्रथम पाणी पाजावे.माश्यांना खादय टाकावे.

तांदूळ व गूळ यांचे दान करावे.,

यांनी पुष्कराज,टोपाझ,सिट्रीन,अक्वामरीन ही रत्ने वापरावीत.

Categories