Gemstones
19 / May

मिथुन रास

या राशीचा स्वामी बुध असून वायूतत्वाची ही रास आहे. महत्वाची कामे ५,१४,२३ या तारखांना करावी. उत्तर आणि दक्षिण या दोन्ही दिशा आपल्याला लाभदायक आहे.

२२ मे ते २१ जून हा कालावधी या राशीचा भाग्यकाळ आहे. महत्वाची कामे या कालावधीत करावीत.

ही द्विस्वभाव राशी आहे.यांची मनःस्थिती सतत द्विधा असते.धरसोडपणा यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे.यांचा कोणावरही विश्वास नसतो.अत्यंत बुध्दीमान असतात.स्वतंत्र व्यवसाय करायला यांना आवडतो.साहित्य,कला,संगीतमध्ये रूची असते.हे लोक निर्णय खूप वेगाने घेतात,त्यामुळे बरेचदा नुकसान होते.यांच्याजवळ उत्तम संवादकौशल्य असतं.

शुभ वार बुधवार,शुक्रवार,शनिवार
अशुभ वार सोमवार
अशुभ रंग काळा
शुभ रंग हिरवा,निळा,पांढरा
मित्र रास तुळ,सिंह,कन्या,कुंभ
शत्रू रास कर्क,वृषभ,मेष
रत्नांचा वापर पाचू,जेड,पेरीडॉट

 

या लोकांनी ज्ञानाचे दान करावे.शिक्षण दयावे.पुस्तके वाटावी.झाडांची व पक्ष्यांची सेवा करावी.पक्ष्यांना दाणे टाकावे.उडीद व तीळ यांचे दान करावे.

यांनी पाचू,जेड,पेरीडॉट हे रत्न वापरावे.

Categories