Gemstones
20 / May

मकर रास

या राशीचा स्वामी शनि आहे.पृथ्वीतत्वाची ही रास आहे.पूर्व आणि दक्षिण या दोन्ही दिशा आपल्याला लाभदायक आहेत.

२२ डिसेंबर ते २० जानेवारी या काळात रवि आपल्या मकर राशीत असतो.महत्वाची कामे या कालावधीत करावी.

आपलं भाग्य स्वकष्टाने निर्माण करतात.हे लोक मेहनती असतात.हे लोक उत्साही,मुत्सदी,महत्वाकांक्षी असतात.व्यवहारकुशल असतात.सुख किंवा यश यांना सहज मिळत नाही.अपमान,दुःख सहन करावे लागते.भरपूर परिश्रम,संकटे,सघर्ष यांना तोंड दयावे लागते.सखोल विचार केल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही.या लोकांवर कारण नसताना दोष लादले जातात,त्यामुळे गैरसमज पसरतात.त्यामुळे अनेक शत्रूही निर्माण होतात.उत्तम इच्छाशक्तीमुळे अनेक कामे त्या तितकेच दक्षतेने करू शकतात.ज्या व्यवहारात फायदा नसेल तर तिथे लक्ष घालत नाही.कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाही.सर्व बाबींमध्ये सावध भूमिका घेतात.एकाग्रता,बुध्दीच्या जोरावर ते आपले ध्येय गाठतात.स्वतःची मते,विचार स्वतंत्र असतात.राजकारणात रस असतो.आपल्या व्यक्तीमत्वाचा इतरांवर प्रभाव पडतो.अन्यायाची यांना चीड असते.अत्यंत भावनाप्रधान लोक असतात.कित्येकांचे आपण आदर्श ठरता.

पोलिस खाते,बॅंकेत,गुप्तहेर खाते,डॉक्टर या क्षेत्रात प्रभाव पडतो.

शुभ वार सोमवार,शनिवार
अशुभ वार मंगळवार,गुरूवार
अशुभ रंग हिरवा
शुभ रंग राखाडी,निळा
मित्र रास कुंभ
शत्रू रास सिंह,धनु.
रत्नांचा वापर निलम,अमेथिस्ट

 

अन्नदान करावे.गरीबाला धान्य दान करावे.

तीळ,लोखंड या वस्तूंचे दान करावे.

या लोकांनी निलम,अमेथिस्ट वापरावे.

Categories