Gemstones
20 / May

धनु रास

ही रास अग्नितत्वाची असून गुरूच्या अधिपत्याखाली येते. ३,१२,२१,३० या तारखांना महत्वाची कामे करावीत.दक्षिण व पश्चिम या दोन्ही दिशा आपल्याला लाभदायक आहेत.

२४ नोव्हेंबर ते २१ डिसेबर हा आपला भाग्यकाळ आहे. महत्वाची कामे या कालावधीत करावी.

या व्यक्ती अत्यंत हुशार,महत्वाकांक्षी असतात.या राशीच्या व्यक्ती त्यांच्या ध्येयाचा लक्षवेध घेतात.जे मिळाले आहे त्यापेक्षा अधिक मिळवण्याचा प्रयत्न असतो.मेहनतीने आपले ध्येय पूर्ण करतात.कोणाच्याही हाताखाली काम करणे यांना आवडत नाही.यांच्या सहवासात राहिल्यावर यांच्यातील स्वभावगुणांचे एक एक पैलू आपल्या लक्षात येतात.अगदी सरळ,साध्या वाटणा-या या व्यक्ती समजण्यास कठीण असतात.चांगल्या, वाईटाची समज यांना उपजतच असते. यांना विनोदाची उत्तम जाण असते.विचारप्रक्रिया इतकी वेगवान असते की एखाद्या चर्चेमध्ये ते मध्येच कुशलतेने आपले विचार प्रकट करतात.उत्तम तर्क करू शकतात.अंहकारी असल्यामुळे स्वतःची चूक लगेच मान्य करत नाही.मित्रमंडळींमध्येही आवडत्या विषयावर वाद घालण्यासाठीही प्रसिध्द असतात.बदलत्या व वेगवान विचारांमुळे त्यांची ध्येयं बदलती असू शकतात.स्पष्ट व फटकळ बोलण्याने स्वतःसाठी शत्रू निर्माण करतात.

सैन्यदल,सामाजिक कार्य,क्रीडाक्षेत्रात चांगलं काम करू शकतात.राजकारण,इंजिनिअरींग ,यांत्रिक क्षेत्रातही यांना चांगले यश मिळते.

शुभ वार गुरूवार,शनिवार
अशुभ वार सोमवार
अशुभ रंग काळा
शुभ रंग पिवळा,जांभळा,गुलाबी
मित्र रास मेष,सिंह
शत्रू रास कर्क,वृश्चिक,मीन
रत्नांचा वापर पुष्कराज,सिट्रीन,टोपाझ,पोवळे

 

वस्त्रदान करावे.धर्मशाळा बांधून दयाव्या.

सुवर्णाचे व लोखंडाचे दान करावे.

यांनी पुष्कराज,सिट्रीन,टोपाझ,पोवळे ही रत्ने वापरावीत.

Categories