Gemstones
19 / May

वृषभ रास

या राशीचा स्वामी शुक्र आहे.पृथ्वीतत्वाची ही रास आहे. ३,६,९.१२.१५.१८,२१,२४,२७,३० या तारखांना महत्वाची कामे करावी.पूर्व आणि उत्तर या दोन्ही दिशा आपल्याला लाभदायक आहेत.

आपल्यामध्ये दुस-यांना आकर्षित करण्याची शक्ती आहे.मैत्री करण्यात आपला हातखंडा आहे.या राशीचे लोक कर्तव्यतत्पर,स्वभावाने शांत,मनमिळाऊ असतात.दुस-यांना मदत करणा-या या व्यक्ती असतात.थोडयाशा हट्टी,टापटीप राहण्याकडे यांचा कल असतो.वादविवादापासून हे लोक दूर राहतात.बौध्दिक कामाचा कंटाळा यांच्यामध्ये असतो.शुक्र हा प्रेम,सौंदर्य व कला ,सुखासिनता दर्शवितो.

२१ एप्रिल ते २१ मे हा आपला भाग्यकाळ आहे.या कालावधीत महत्वाची कामे करावी.

शुभ वार बुधवार, गुरूवार, शुक्रवार.
अशुभ वार शनिवार.
अशुभ रंग काळा,लाल
शुभ रंग पांढरा,निळा,हिरवा
मित्र रास कुंभ,मकर
शत्रु रास सिंह,धनु,मीन
रत्नांचा वापर हिरा,स्फटिक

 

या राशीच्या लोकांनी बैलास चारा खाऊ घालावा.दूध,पिवळे वस्त्र दान करावे.अन्नदान करावे.गरीबाला धान्य दयावे.सकाळी उठल्यावर भूमीला हात लावून वंदन करून कामाला लागावे.

हिरा,स्फटिक यांना शुभ ठरू शकतो.त्यामुळे यांना चांगले अनुभव येतील आणि मानसिक समाधान लाभेल.

Categories