Gemstones
19 / May

मेष रास

अग्नितत्वाची ही रास असून मंगळाच्या अधिपत्याखाली येते. ९,१८,२७ या तारखांना महत्वाची कामे करावी. या लोकांमध्ये प्रचंड आणि अविरत ऊर्जा असते.पूर्व आणि दक्षिण या दोन्ही दिशा आपल्याला लाभदायक आहेत.

या व्यक्तिंचे स्वभावगुण हट्टी,चिडखोर,उतावीळ,बेफिकीर,धाडसी,कष्टाळू,स्वतंत्र,आत्मकेंद्रीत असतात.हे लोक प्रामाणिक असतात.कोणत्याही प्रकारचा अन्याय ते अजिबात सहन करू शकत नाही.जर आपले ग्रहमान अनुकूल नसेल तर आपल्याला वाईटच अनुभव येतात,हे लक्षात घेऊन आपण स्वतःच्या स्वभावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.कौटुंबिक वातावरण बिघडवण्यात आपला वाटा मोठा असतो.आपल्या ताठर स्वभावाने जोडीदार ,मुले दुरावतात.त्यांना आपल्याबद्दल प्रेम वाटत नाही.

२१ मार्च ते २० एप्रिल हा आपला भाग्यकाळ आहे.या काळात आपण महत्वाची कामे करावीत.

मंगळाच्या गुणधर्माच्या पोवळे,कार्नेलियन या रत्नांचा वापर करावा.सल्ल्यानुसार व्यक्तिपरत्वे माणिक, गार्नेट फायदेशीर ठरतो.

ही रत्ने धारण केली असता मेष व्यक्तींना आपल्यातील ऊर्जा योग्य रितीने वापरण्यास व स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

शुभ वार मंगळवार,गुरूवार,रविवार
अशुभ वार शनिवार,सोमवार
अशुभ रंग हिरवा,काळा,लाल
शुभ रंग गुलाबी,लाल,पिवळा,नारंगी
मित्र रास सिंह,तुळ,धनु.
शत्रू रास मिथुन ,कन्या
रत्नांचा वापर पोवळे,कार्नेलियन

 

आपण वस्त्रदान करावे.धर्मशाळा बांधून द्याव्या.

Categories